Created by Aditya, Date : 06.12.2024
MSRTC Aavdel Thethe Pravas : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत 1988 पासून आवडेल तेथे कुठे प्रवास योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सात दिवसाच्या पास प्रमाणे चार दिवसाचा पास सुद्धा दिला जातो.
कमीत कमी 1170 रुपये पासून तुम्ही महाराष्ट्रभरात कुठेही प्रवास करू शकता हा प्रवास साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती, तसेच शिवशाही गाड्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे.
सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हा पास एसटी महामंडळातर्फे दिला जातो महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही बसने प्रवास करू शकता.
प्रवासाचे नियम
या योजनेअंतर्गत सातवा चार दिवसाच्या पास दिले जातात साध्या सेवेचे पास सर्व प्रकारचे साधे बसेस साठी साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती आंतरराज्य मार्ग साठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
निम आराम बसवेसाठी स्वातंत्र्यदर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बस सेवा साठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सह साधी निम आराम, वातानुकूलित व सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्ग सह ग्राह्य धरण्यात येईल.
फक्त 585 रुपयांत महाराष्ट्रभर एसटी प्रवास करण्यासाठी येथे क्लिक करा
पास कधी मिळेल
या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर पर्यंत काढता येतील हे पास काढण्यासाठी तुम्ही कोणत्याही बस स्थानकावर जाऊन त्याविषयीची चौकशी करू शकता आणि पास काढू शकता.
आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचा पास नियमित बसेससोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या बस मध्ये सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पास हरवलास तुम्ही पास काढल्यानंतर पास हरवला तर त्या ऐवजी दुसरा पास तुम्हाला मिळत नाही तसेच हरवलेला पासचा कोणताही परतावा तुम्हाला दिला जाणार नाही.
यासोबतच सदरचा पास हा हस्तांतरणीय राहील पासचा गैरवापर करण्यात आल्यास त्याचा पास जप्त करण्यात येईल व त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल.
आंतरराज्य महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसणे प्रवास करता येईल इतर राज्याच्या बसमधून या पासवर तुम्ही प्रवास करू शकत नाही.
फक्त 585 रुपयांत महाराष्ट्रभर एसटी प्रवास करण्यासाठी येथे क्लिक करा
पासचे दर (MSRTC Aavdel Thethe Pravas)
तुम्हाला सुद्धा हा पास काढायचा असेल तर या पासचे दर सात दिवसासाठी आणि चार दिवसासाठी वेगवेगळे आहेत साध्या बसेस साठी सात दिवसाचा पास काढत असाल आणि तुम्ही प्रौढ नागरिक असाल तर 2040 रुपये चार दिवसाच्या पास साठी 1170 रुपये, मुलांसाठी सात दिवसाच्या 1025 रुपये चार दिवसाच्या 585 रुपये.
शिवशाही बसेस साठी सात दिवसाचे पासचे दर प्रौढ नागरिक 3030, मुले 1520 चार दिवसाचे 1520 प्रौढ, 765 मुले वर दाखवलेले दर हे बारा वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी व पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षे पेक्षा कमी असलेल्या मुलांसाठी राहणार आहेत.