Created by Aditya, Date: 05.12.2024
APAAR ID Card : वन नेशन वन स्टुडन्ट आयडीन कार्ड अंतर्गत भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी कार्ड जरी केले आहे हे अपार आयडी कार्ड तुम्हाला काढून घेणे आवश्यक असेल, या अपार आयडी कार्ड मध्ये विद्यार्थ्यांची आतापर्यंतची सर्व शैक्षणिक माहिती उपलब्ध राहणार आहे.
या सर्व शैक्षणिक माहितीचा वापर विद्यार्थ्यांना अधिक समृद्ध बनविण्यासाठी केला जाईल, कोणत्या शिष्यवृत्ती देता येतील, सर्व शैक्षणिक माहिती या कार्डद्वारे मिळणार आहे. कोणत्याही परीक्षेसाठी, जॉब साठी किंवा दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठी तुम्ही या अपार आयडी चा वापर करू शकता.
भारत सरकारने 2020 मध्ये या कार्डला सुरुवात केलेली आहे आधार कार्ड सारखे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीसाठी अपार आयडी कार्ड अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे अपार आयडी कार्ड चा नंबर हा सुद्धा बारा अंकी असेल हे तुम्हाला डिजिटली स्टोअर करता येईल व त्याची फिजिकल कॉपी सुद्धा तुमच्याकडे राहणार आहे.
अपार आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा
या कार्ड मध्ये तुमचे आतापर्यंतचे स्कोर कार्ड, क्रेडिट, मार्कशीट, ग्रेड सीट, डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा इतर कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्या त्याची माहिती सुद्धा या आयडी मध्ये राहणार आहे. हे अपार आयडी कार्ड तुम्हाला काढण्यासाठी सध्या तरी भारत सरकारकडून पालकांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
अपार आयडी कसे काढावे?
अपार आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले शाळेला भेट द्यावी लागेल काही शंका असल्यास तुम्हाला शिक्षकांना विचारावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक कन्सेंट कॉपी दिली जाईल ती कन्सेंट कॉपी भरून तुम्हाला शाळेमध्ये जमा करायची आहे.
तुमच्या डेमोग्राफिक डिटेल्स चेक करायच्या आहेत जसे की नाव असेल, जन्मतारीख असेल, लिंग असेल व्यवस्थित माहिती आधार कार्डवर व शाळेच्या रेकॉर्डर आहे का नाही ते चेक करायच आहे आणि कन्सेंट भरून घ्यायचा आहे.
कन्सेंट भरल्यानंतर शाळा हे कन्सेंट ऑथोराइज करेल व सिस्टीमला अपलोड करेन व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अपार आयडी जनरेट होईल आणि डिजिलॉकरला या कार्डचा एक्सेस तुम्हाला मिळेल.
शाळेमध्ये जे नाव तुम्ही आधार कार्डवर दिलेला आहे तेच नाव शाळेच्या रेकॉर्ड सुद्धा असणं आवश्यक आहे जर नावामध्ये चूक असेल तर सर्वप्रथम आधार चेंज करून घ्यावे व त्यानंतरच अपार आयडी जनरेट करावा.
अपार आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक गोष्टी (APAAR ID Card)
युनिक स्टुडन्ट आयडेंटिफायर,विद्यार्थ्यांची जन्मतारीख, विद्यार्थ्यांचे लिंग, मोबाईल नंबर, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधार कार्ड नुसार विद्यार्थ्यांचे नाव व आधार नंबर आवश्यक असेल.
अपार आयडी जनरेट झाल्यानंतर याची माहिती तुम्हाला डिजिलॉकर च्या अकाउंट ला तुम्हाला पाहायला मिळेल व अपार आयडी कार्ड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे यापेक्षा अधिक काही माहिती हवी असल्यास सर्वप्रथम शाळेला भेट द्यावी व आपल्या पाल्याचे अपार आयडी कार्ड काढून घ्यावे.